99.91 टक्के नालेसफाई

By admin | Published: June 20, 2014 01:49 AM2014-06-20T01:49:12+5:302014-06-20T01:49:12+5:30

मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर अद्याप पाहिजे तसा तो बरसलेला नाही.

99.91 percent of Nalcea | 99.91 टक्के नालेसफाई

99.91 टक्के नालेसफाई

Next
>मुंबई : मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर अद्याप पाहिजे तसा तो बरसलेला नाही. त्यामुळे नाले तुंबण्याच्या घटना घडलेल्या नसल्याने पालिकेलाही आपण केलेल्या सफाईचा अंदाज आलेला नाही. परंतु असे असले तरी महापालिका प्रशासनाने विरोधकांवर कुरघोडी करीत नाल्यांसह मिठी नदीची साफसफाई तब्बल 99.91 टक्के झाल्याचा दावा केला आहे.
मुंबईकरांना नाल्यांसह मिठी नदीच्या पुराला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने एप्रिल महिन्यापासून नालेसफाई हाती घेतली. मे महिन्याच्या पूर्वार्धात सफाईची आकडेवारी सादर करीत सत्ताधारी वर्गाने नालेसफाईचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐन स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी नालेसफाईच्या कामाची चिरफाड करीत प्रशासनाचे पितळ उघडे पाडले. त्यात स्थायी समितीच्या बैठकीत नालेसफाईवरून गदारोळ झाला आणि प्रशासनाने पुढील बैठकीत नालेसफाईची सविस्तर आकडेवारी सादर करण्याचे मान्य केले.
महापालिका प्रशासनाकडूनच मिळालेल्या माहितीनुसार, आतार्पयत शहर विभागातील 8क् हजार 88क् मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे आणि या अंतर्गत 72 हजार 36क् घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे; शिवाय ज्या नाल्याच्या सफाईसाठी मनुष्यबळ वापरता येत नाही अशा शहर विभागातील 18 हजार 8क्7 मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे आणि त्यातून 24 हजार 11क् घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. 
पश्चिम उपनगरात 1 लाख 3क् हजार 612 मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात आली असून, त्यातून 1 लाख 66 हजार 723 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पूर्व उपनगरातील 89 हजार 954 मीटर नाल्यांची सफाई करण्यात आली असून, त्यातून 1 लाख 1 हजार 96क् घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. एकंदर शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील 3 लाख 2क् हजार 253 मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात आली असून, 3 लाख 65 हजार 153 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
दरम्यान, शहर विभागातून वाहणा:या मिठी नदीच्या 5 हजार 98क् मीटर लांबीच्या सफाईत 56 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पश्चिम उपनगरातील 4 हजार 7क् मीटर लांबीच्या सफाईत 51 हजार 1क्क् घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पूर्व उपनगरातील 13 हजार 175 मीटर लांबीच्या सफाईत 1 लाख 41 हजार 84क् घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 99.91 percent of Nalcea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.