९ वी १० वीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत ...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 05:44 PM2020-05-30T17:44:42+5:302020-05-30T17:45:05+5:30
भाजप शिक्षक आघाडीची सरकार कडे मागणी; लॉकडाऊनमुळे पालक आर्थिक संकटात
मुंबई : महाराष्ट्रातील कामगार , मजूर , शेतकरी , हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊनमुळे अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे अश्या परिस्थितीत या वर्षी गणवेश , नोटबुक , पुस्तके विकत घेण्यासाठी पैसा कुठन आणायचा हा सर्व सामान्य जनतेसमोर प्रश्न उपस्थित झाला असून या शैक्षणिक वर्षात तरी ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनाही शालेय पाठ्यपुस्तके सरकारने मोफत दयावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा शिक्षक आघाडीने शासनाकडे मुख्यमंत्री , शिक्षण मंत्री अप्पर सचिव व शिक्षण आयुक्त याना केली आहे.
संपूर्ण राज्यात लॉक डाऊन ची परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे . ज्याप्रमाणे इय्यता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पाठ्यपुस्तके मोफत पुरवली जातात त्याचप्रमाणे निदान या शैक्षणिक सत्रात तरी इय्यता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनाही शालेय पाठ्यपुस्तके मोफत पुरविण्यात यावी जेणेकरून आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी शालेय पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही व त्याला वेळेवर पाठ्यपुस्तके मिळाली तर त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही व याकरिता खूप मोठ्या आर्थिक तरतुदींची देखील गरज भासणार नाही, कोविड -१९ च्या नावाखाली असा खर्च विद्यार्थ्यांकरिता सरकारने ठरवले तर नक्की खर्च करता येईल . सरकार विद्यार्थ्यांच्या या रास्त मागणीवर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . त्यामुळे मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ या शैक्षणिक सत्रात तरी इय्यता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनाही मिळवून द्यावा अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या माद्यमातून करण्यात आल्याची माहिती बोरनारे यांनी केली आहे.