वांद्रे येथे उभारणार १२ मजली विश्रामगृह, १४३ कोटी रुपये खर्च, निविदा निघाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 07:34 AM2023-01-16T07:34:57+5:302023-01-16T07:35:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे येथे ४८ हजार चौरस फूट जागेवर १२ मजल्यांचे, ५०० खोल्यांचे भव्य शासकीय विश्रामगृह ...

A 12 storey rest house will be built in Bandra | वांद्रे येथे उभारणार १२ मजली विश्रामगृह, १४३ कोटी रुपये खर्च, निविदा निघाली

वांद्रे येथे उभारणार १२ मजली विश्रामगृह, १४३ कोटी रुपये खर्च, निविदा निघाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वांद्रे येथे ४८ हजार चौरस फूट जागेवर १२ मजल्यांचे, ५०० खोल्यांचे भव्य शासकीय विश्रामगृह येत्या दोन वर्षांत उभारण्यात येणार असून, त्यावर १४३ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

सा. बां. खात्याने यासाठीची निविदा काढली असून, वांद्रे येथे आधीपासूनच असलेल्या शासकीय संक्रमण गृहाच्या जागी हे विश्रामगृह आकारास येईल. या विश्रामगृह प्रकल्पासाठी २२ ऑगस्ट २०१९ रोजी १६२ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली होती. तथापि, कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कोणतेही नवीन बांधकाम हाती घेऊ नये आणि कोणतीही तांत्रिक मान्यतादेखील देऊ नये असा शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यामुळे या विश्रामगृहासाठी खासगी वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करून प्रकल्पाचे हाती घेणे शक्य झाले नव्हते. हे विश्रामगृह वांद्रे शासकीय वसाहत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्याचे आधी नियोजन होते. तथापि, या पुनर्विकास प्रकल्पास विलंब होत असल्याने आता त्याची उभारणी स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी असेल रचना

या विश्रामगृहाचे स्वरूप तीन भूमिगत मजले, एक तळमजला, एक व्यावसायिक मजला आणि वर ११ मजले असे असेल. या ११ मजल्यांमध्ये २८६ अतिथी कक्ष, १० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीचे कक्ष आणि इतर २९६ कक्ष असतील. आठ लिफ्ट आणि दोन फायर लिफ्ट असतील. याशिवाय, रेस्टॉरन्ट, कँटिन, कॉन्फरन्स रूम असेल. प्रकल्पास तांत्रिक मान्यता आधीच देण्यात आली असून बांधकामाच्या निविदेत कोणी बाजी मारली हे पुढील महिन्यात स्पष्ट होईल.

Web Title: A 12 storey rest house will be built in Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई