भिवंडीत नाल्यात पडून शाळकरी १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

By नितीन पंडित | Published: July 19, 2023 09:01 PM2023-07-19T21:01:27+5:302023-07-19T21:02:36+5:30

नाल्यात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही भावंडे नाल्यात पडले होते

A 14-year-old schoolgirl died after falling into a drain in Bhiwandi | भिवंडीत नाल्यात पडून शाळकरी १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडीत नाल्यात पडून शाळकरी १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

googlenewsNext

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली टेमघर परिसरात घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ पसरली आहे. सुजाता बबन कदम वय १४ वर्ष असे नाल्यात बुडून मृत्यू झालरल्या मुलीचे नाव आहे.ती महापालिकेच्या माध्यमिक शाळेत इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत होती.दुपारी शाळा सुटल्या नंतर ती आपल्या भावा सोबत घरी येत होती.घरी परतत असतांना टेमघर स्मशानभूमी जवळ असलेल्या नाल्यात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही भावंडे नाल्यात पडले होते.

यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी भावाला नाल्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत सुजाता हि वाहत दूर गेल्याने स्थानिक नागरिकांना तिला वाचविता आले नाही. अखेर आपत्कालीन विभागाला बोलवून दीड दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर सुजाता हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचू न शकल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुखांनी पालिकेच्या जीपमधूनच मुलीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

Web Title: A 14-year-old schoolgirl died after falling into a drain in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.