Join us

Coronavirus: चिंता वाढली! मुंबई ते बडोदा प्रवास केलेल्या 67 वर्षीय व्यक्तीत आढळला XE व्हेरिअंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:55 PM

एक्स ई हा व्हेरीअंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो, असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते.

मुंबई - मुंबई ते बडोदा असा प्रवास केलेल्या एका 67 वर्षीय व्यक्तीत एक्स ई व्हेरिअंट (XE Veriant) आढळल्याचे आज एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये 12 मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षण विरहित आहे. या रुग्णाने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

एक्स ई हा व्हेरीअंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो, असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसगुजरात