पोलिसाच्या पायावर घातली दुचाकी; चालक पसार, पार्कसाइट पोलिसात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:31 AM2023-03-27T11:31:19+5:302023-03-27T11:31:29+5:30
२४ मार्च रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ते ट्राफिक वॉर्डन कुणाल माने यांच्यासोबत गांधीनगर जंक्शन येथे कर्तव्यावर होते.
मुंबई : विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने दिलेल्या धडकेत पोलिसाच्या पायाला दुखापत झाली. संदीप वाणी (४२) असे त्यांचे नाव असून ते पार्कसाइट पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत आहेत. अपघातानंतर चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
२४ मार्च रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास ते ट्राफिक वॉर्डन कुणाल माने यांच्यासोबत गांधीनगर जंक्शन येथे कर्तव्यावर होते. त्याच दरम्यान अनोळखी दुचाकीचालक पाठीमागे एका महिलेसह त्या रस्त्यावरून निघाला होता. त्याने हेल्मेट न घातल्याने तसेच पुढे नंबर प्लेट न दिसल्याने त्याच्या विरोधात इ चलन कारवाईसाठी वाणी यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना पाहून त्याने वाहनाचा वेग कमी करत गाडी थांबवित असल्यासारखे भासवले आणि वाणी यांच्याजवळ येताच अचानक वाहनांचा वेग वाढवित पळण्याचा प्रयत्न केला. त्यात वाणी यांच्या डाव्या पायाला गाडीचे पुढचे चाक आदळले ज्यात त्यांना दुखापत झाली. वाणी चालकाच्या मदतीला धावून जात त्याचे नाव आणि लायसन्सबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने वाणींसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.