भूमाफीयां विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक मांडणार

By मनोहर कुंभेजकर | Published: June 17, 2023 04:16 PM2023-06-17T16:16:15+5:302023-06-17T16:16:24+5:30

आमदार सुनील राणे यांची माहिती

A bill will be introduced in the coming session regarding filing of case against land expropriation | भूमाफीयां विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक मांडणार

भूमाफीयां विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक मांडणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-सरकारी जमिनी या प्रामुख्याने तिकडे राहणाऱ्या जनतेसाठी शाळा,महाविद्यालय,समाज मंदिर,व्यायामशाळा आणि अन्य लोकपयोगी उपक्रम राबविण्यासाठी असतात.मात्र गेली अनेक वर्षे सरकारी जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफीयां विरोधात आगामी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गुन्हा दाखल करण्या संदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक मांडणार असल्याची माहिती  बोरीवलीचे आमदार सुनील राणे यांनी आज बोरीवलीत एका पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय जनता पार्टी बोरिवली विधानसभेच्या वतीने 'मोदी @ ९' च्या पार्शवभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन त्यांनी केले होते,त्यावेळी ते बोलत होते.आगामी पिढी साठी बोरिवली पश्चिम येथील अतिक्रमण हटवून आकाशवाणीच्या जागेवर केंद्रीय विद्यालय उभारण्याची सरकारकडे मागणी करणार असून,गोराई गावातील येथील निष्कशीत सरकारी जमिनीवर शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी बोरिवली भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा निवळे,बोरिवली भाजप अध्यक्ष गुप्ता,बोरिवली भाजप युवा मोर्चा अध्यक्ष नैनेश शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई भाजप अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांच्या आगामी मुंबई महानगर पालिकेत १५० नगरसेवक निवडून आणणार या त्यांच्या मिशन बद्धल लोकमतने विचारले असता,आगामी निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना. भाजप एकत्र लढणार असून आगामी मुंबईचा महापौर आमच्याचयुतीचा असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले. तर आगामी पालिका निवडणूकीत बोरीवली विधानसभा क्षेत्रातून नवे चेहरे देणार का?या बद्धल लोकमतने त्यांना विचारले असता
पालिका निवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचे हा पक्षाचा निर्णय असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

बोरिवली गोराई जेट्टी ते गोराई गावाच्या बाहेर जाणारा पूल भविष्यात साकारणार आहे. यामुळे वर्सोवा वसई हा सागरी पूल वर्सोवा,मनोरी,गोराई,उत्तन आणि वसई या पाच स्पॉट वरून जाणार असून टनेल मधून संजय गांधी नॅशनल पार्क मधून बोरिवली-ठाणे अंतर १० मिनीटात पार करता येईल.यामुळे  भविष्यात मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१५ ऑगस्ट पर्यंत ३५०० गिरणी कामगारांना घरे देणार

गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी शासनाने आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली होती. गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी अनेक वर्षे चर्चा होती,मात्र त्यांच्या आयुष्यात सोन्याचा दिवस आला आणि २०२०च्या सोडतीतील बॉम्बे डाइंग,आणि श्रीनिवासच्या पात्र १६२  गिरणी कामगारांना नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरे आणि चाव्या दिल्या. तर येत्या १५ ऑगस्ट पर्यंत ३५०० पात्र गिरणी कामगारांना घरे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी  'मोदी @ ९' या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची झालेली आधुनिक भारताची  चौफेर प्रगती आणि त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला.त्यासंदर्भात त्यांनी पत्रकरांना चित्रफीत दाखवली.

Web Title: A bill will be introduced in the coming session regarding filing of case against land expropriation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.