Join us

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी आमदार अवधुत तटकरे साथ सोडणार, भाजपात जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 10:44 AM

Avadhut Tatkare: ठाकरे गटाचा आणखी एक नेता विरोधकांच्या गळाला लागला असून, माजी आमदार अवधुत तटकरे हे ठाकरेंची साथ सोडून भाजपात जाणार आहे. आज त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो.

मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला लागलेला गळती अद्यापही थांबलेली नाही. पक्षात फूट पडून आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला बाळासाहेबांची शिवसेना अशई नावं मिळाली आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचा आणखी एक नेता विरोधकांच्या गळाला लागला असून, माजी आमदार अवधुत तटकरे हे ठाकरेंची साथ सोडून भाजपात जाणार आहे. आज त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो.

रोहा-श्रीवर्धन मतदारसंघातील माजी आमदार असलेले अवधुत तटकरे यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रोहा-श्रीवर्धन मतदारसंघातून विजय मिळवला होता.

दरम्यान, २०१९ मध्ये या मतदारसंघातून अदिती तटकरे निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता अवधुत तटकरे यांना पक्षात घेऊन अदिती तटकरे यांना भाजपा आव्हान देऊ शकतो. अवधुत तटकरे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते शिवसेनेत होते. 

टॅग्स :शिवसेनाभाजपाउद्धव ठाकरे