Join us

फोन पेवर मागितली ३० हजारांची लाच; सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:43 AM

नौदल अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय लष्करात सुभेदारपदासाठी (धर्मशिक्षक) सकारात्मक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी एका उमेदवाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नौदलाच्या एका अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल करून  त्याला अटक केली आहे. संजू अर्लाकट्टी असे या नौदल अधिकाऱ्याचे नाव असून तो नौदलाच्या अश्वीनी रुग्णालयात कार्यरत आहे. 

भारतीय लष्करातील भरतीसाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी मुंबईत भारतील नौदलाच्या आयएनएस अश्विनी या रुग्णालयात अलीकडेच झाली. यावेळी लष्कराच्या डॉक्टरांना संजू अर्लाकट्टी हा नौदलाचा अधिकारी सहाय्य करत होता. या प्रकरणातील तक्रारदार उमेदवाराची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्याला दुसऱ्या इमारतीत नेले व वैद्यकीय चाचणीमध्ये उतीर्ण असा अहवाल हवा असेल तर ३० हजार रुपयांची मागणी केली हाेती.

उद्यापर्यंत ठाेठावली सीबीआय काेठडीउमेदवाराने घडलेला घटनाक्रम लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. तसेच त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीला सांगितले. उमेदवाराने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सीबीआयने तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या कारवाई सीबीआयच्या अधिकाऱ्याने केलेल्या सूचनेप्रमाणे त्या उमेदवाराने संबंधित अधिकाऱ्याला पाच हजार रुपये प्रथम फाेन पेवर पाठवले. त्यानंतर सापळा लावून त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. या अधिकाऱ्याला न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :गुन्हा अन्वेषण विभागमुंबई