Join us

आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिकाचा मोबाईल लंपास!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By गौरी टेंबकर | Published: June 14, 2024 4:34 PM

तक्रारदार अमित राठी (४९) हे १ जून रोजी त्यांच्या मित्रांसोबत कामानिमित्त बंगळुरूला गेले होते. काम संपल्यानंतर ते ६ जून रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटने मुंबईला परतले.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यावसायिकाचा महागडा मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

तक्रारदार अमित राठी (४९) हे १ जून रोजी त्यांच्या मित्रांसोबत कामानिमित्त बंगळुरूला गेले होते. काम संपल्यानंतर ते ६ जून रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटने मुंबईला परतले. ते १२.४० च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १ कडे आले. त्यांनी १.१० च्या सुमारास त्यांचे चेकिंग बॅग पिकअप करण्यासाठी ते बेल्ट क्रमांक २ याठिकाणी उभे राहिले. त्यावेळी त्यांचा जवळपास १.७९ लाखांचा मोबाईल फोन त्यांनी ट्रॅक पॅन्टच्या खिशात ठेवला. जवळपास २० एक मिनिटांनी ते बॅक पिकप करून ट्रॉलीबॅगसह अरायव्हल गेटच्या एक्झिट गेटकडे आले. त्यावेळी त्यांचा फोन त्यांच्या खिशात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे लगेचच तो शोधण्यासाठी ते माघारी फिरले. त्यांनी सर्वत्र फोनचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर याविरोधात त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. 

पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मात्र व्हीव्हीआयपी दर्जाच्या लोकांची वर्दळ असल्याने संवेदनशील तसेच कडेकोट सुरक्षा असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असे भुरटे चोर शिरू लागल्याने सुरक्षेबाबत आत चिंता उपस्थित होत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसविमानतळ