मुंबई: आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यामध्ये दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले-
१. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश... ( अन्न व नागरी पुरवठा)
२. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ...( ऊर्जा विभाग)
३. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ... (अल्पसंख्याक विकास विभाग)
४. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी... (विधी व न्याय)
५. इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा...( गृहनिर्माण)