समुद्रातलं शांत वादळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 11:43 AM2023-01-15T11:43:58+5:302023-01-15T11:44:33+5:30
विनय उपासनी, मुख्य उपसंपादक जूबाजूला अथांग अरबी समुद्र. उंचच उंच उसळणाऱ्या लाटा. समुद्राचे झोंबणारे खारे वारे. सतत अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर असलेला निसर्ग. अशा आव्हानात्मक परिस्थितीत खोल खोल समुद्राच्या तळाशी दडलेल्या तेलाचे उत्खनन करण्याची अवघड जबाबदारी, तीही निरंतर चालणारी प्रक्रिया. डोळ्यांसमोर आणून बघा हे चित्र. नक्कीच अंगावर शहारे येतील. अशीच कामगिरी बजावली जाते मुंबई हायवर... आपल्या एकूण गरजेच्या ८२ टक्के खनिज तेल भारत आयात करत असतो. उर्वरित गरज देशांतर्गत तेल उत्पादनातून भागवली जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) अशा अनेक तेल कंपन्या तेलाचे उत्पादन करतात. त्यासाठी देशभरात त्यांच्या अनेक ठिकाणी तेलविहिरी आहेत. त्यातीलच एक म्हणजे मुंबई हाय. ...
विनय उपासनी, मुख्य उपसंपादक
जूबाजूला अथांग अरबी समुद्र. उंचच उंच उसळणाऱ्या लाटा. समुद्राचे झोंबणारे खारे वारे. सतत अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर असलेला निसर्ग. अशा आव्हानात्मक परिस्थितीत खोल खोल समुद्राच्या तळाशी दडलेल्या तेलाचे उत्खनन करण्याची अवघड जबाबदारी, तीही निरंतर चालणारी प्रक्रिया. डोळ्यांसमोर आणून बघा हे चित्र. नक्कीच अंगावर शहारे येतील. अशीच कामगिरी बजावली जाते मुंबई हायवर...
आपल्या एकूण गरजेच्या ८२ टक्के खनिज तेल भारत आयात करत असतो. उर्वरित गरज देशांतर्गत तेल उत्पादनातून भागवली जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) अशा अनेक तेल कंपन्या तेलाचे उत्पादन करतात. त्यासाठी देशभरात त्यांच्या अनेक ठिकाणी तेलविहिरी आहेत. त्यातीलच एक म्हणजे मुंबई हाय.
ओएनजीसीच्या अखत्यारितील मुंबई हाय या तेलविहिरी मुंबईच्या किनाऱ्यापासून १७६ किमी अंतरावर भर अरबी समुद्रात आहेत. १९६५ मध्ये भारतीय तेल संशोधन पथकांनी या ठिकाणी तेलाचे साठे असल्याचे शोधून काढले. त्यानंतर १९७४ पासून मुंबई हायचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले.