भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल
By संताजी शिंदे | Published: May 17, 2024 07:12 PM2024-05-17T19:12:34+5:302024-05-17T19:13:09+5:30
१ मे रोजी झालेल्या जाहीर सभेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाषण केले होते.
सोलापूर : लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत भाजप युवा नेते देवेंद्र कोठे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते.
१ मे रोजी झालेल्या जाहीर सभेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाषण केले होते. त्यांच्या विरोधात मुस्ताक महबूब शेख यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. देवेंद्र कोठे यांच्यावर १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूरात राष्ट्रीय पातळीवरील नेते सोलापूरात येत होते. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये देवेंद्र कोठे यांनी हे धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गु.र.नं. २३४/२०२४ भादविसक २९५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.