Join us

रेल्वे भरती घोटाळाप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

By मनोज गडनीस | Published: January 09, 2024 6:49 PM

पेपर लीक प्रकरण, सीबीआयची कारवाई.

मुंबई - रेल्वेमध्ये भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धापरिक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी सीबीआयने रेल्वेच्या नऊ कर्मचाऱ्यांसह खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सहा अशा एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, याच अनुषंगाने मंगळवारी सीबीआयने मुंबई, सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर येथे एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली. या परिक्षेत झालेल्या घोटाळा प्रकरणी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. 

उपलब्ध माहितीनुसार, रेल्वेमध्ये कनिष्ठ लिपिक तथा टायपिस्ट या पदासाठी ३ जानेवारी २०२१ रोजी परिक्षा झाली होती. या परिक्षेसाठी देशभरातून ८६०३ उमेदवारांनी अर्ज केला होता. ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीन होणार होती. याकरिता मुंबईतील अंधेरीस्थित एका कॉम्प्युटर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला परिक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने रेल्वेमध्ये ट्रॅकमनचे काम करणाऱ्या नऊ लोकांनी परिक्षेपूर्वीच परिक्षेचा पेपर व त्यांची उत्तरे मिळवत परिक्षेसाठी बसलेल्या काही उमेदवारांना त्याची विक्री केली.

टॅग्स :मुंबई