डॉक्टरचे घर हडप करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:10 PM2023-05-17T15:10:20+5:302023-05-17T15:10:41+5:30

दरम्यानच्या कोरोनाचे कारण सांगून पूजा काहीकाळ सहकुटुंब तेथे राहिली. मात्र, नंतर ती रूम तिने चार लाख रूपये डिपॉझिट घेऊन भलत्याच दिली. 

A case has been registered against the four who usurped the doctor's house | डॉक्टरचे घर हडप करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

डॉक्टरचे घर हडप करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई : साकीनाका येथील काजूपाडा विभागातील डॉक्टर सुरेशकुमार यादव यांचे घर हडप केल्याच्या आरोपावरून भाडेकरू दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.   

साकीनाका येथे राहणारे डॉ. सुरेशकुमार यादव यांनी २०२० साली त्यांच्या दवाखान्यात येणारी रुग्ण पूजा विश्वकर्मा हिच्या ओळखीवरून राकेश मिश्रा यांचे घर खरेदी केले होते. त्यानंतर पूजाने ती रूम अकरा महिन्यांसाठी भाड्याने देण्याची विनंती डॉ. यादव यांना केली. डॉ. यादव यांना घराची कागदपत्रे चाळमालकामार्फत आपल्या नावावर करायची असल्याने पूजाच्या सांगण्यावरून त्यांनी ती कागदपत्रे रामप्रसिद्ध दुबे याला दिली. दरम्यानच्या कोरोनाचे कारण सांगून पूजा काहीकाळ सहकुटुंब तेथे राहिली. मात्र, नंतर ती रूम तिने चार लाख रूपये डिपॉझिट घेऊन भलत्याच दिली. 
 

Web Title: A case has been registered against the four who usurped the doctor's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.