शिवाजी पार्कवरील ठाकरे-शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

By मनीषा म्हात्रे | Published: November 17, 2023 07:52 PM2023-11-17T19:52:23+5:302023-11-17T19:53:00+5:30

Mumbai News: शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता.

A case has been registered in the case of Thackeray-Shinde group Rada on Shivaji Park, investigation is underway with the help of CCTV | शिवाजी पार्कवरील ठाकरे-शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

शिवाजी पार्कवरील ठाकरे-शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

मुंबई  - शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत स्मृतीस्थळ परिसर रिकामी केला. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी ५० ते ६० अनोळखी व्यक्तीविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

बाळासाहेब स्मृतीस्थळावर नेमकं काय घडलं याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून  चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी दादर परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत.  

याप्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होत गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनीही रेकॉर्डिंग केले आहे. त्याच, रेकॉर्डिंगच्या आधारे गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु आहे. याप्रकरणात सिसिटीव्ही आणि रेकॉर्डिंगच्या मदतीने सर्वांची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A case has been registered in the case of Thackeray-Shinde group Rada on Shivaji Park, investigation is underway with the help of CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.