Sharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सिल्व्हर ओकवर खणाणला फोन, लगेचच तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:55 AM2022-12-13T11:55:04+5:302022-12-13T12:05:45+5:30

A case has been registered in the Mumbai Police regarding the phone threatening to MP Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

A case has been registered in the Mumbai Police regarding the phone threatening to MP Sharad Pawar | Sharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सिल्व्हर ओकवर खणाणला फोन, लगेचच तक्रार दाखल

Sharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सिल्व्हर ओकवर खणाणला फोन, लगेचच तक्रार दाखल

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या निवासस्थानी फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे, कालच शरद पवार यांचा वाढदिवस होता तर आज दुसऱ्याच दिवशी अज्ञाताने फोन करुन ही धमकी दिली आहे. 

अज्ञात व्यक्तीने फोनवरुन ही धमकी दिली आहे. मुंबईत येऊन गावठी कठ्ठ्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे, फोन करणारा व्यक्ती हिंदीमध्ये बोलत असल्याची माहिती समोर आली आहे. 

Sharad Pawar on Samruddhi Mahamarg: समृद्धीला कुणी विरोध केला? शिंदे, फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांनी केला खुलासा

शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने ही तक्रार दिली आहे. मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. 

काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला होता. राऊत यांनीही या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. संजय राऊत यांच्यानंतर आता खासदार शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. 

काल शरद पवार यांचा वाढदिवस राज्यभरात साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राष्ट्रवादीकडून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

'समृद्धी महामार्गाला कुणी विरोध केला हे माहिती नाही. औरंगाबादला गेलो असताना शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली. या रस्त्यासाठी जमिनी घेत आहेत. परंतु जमिनीची रास्त किंमत देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांना कॉल केला आणि ज्यांच्या जमिनी घेत आहात त्यांना रास्त किंमत द्या, असे सुचवले होते. राष्ट्रवादीने समृद्धीला विरोध केला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: A case has been registered in the Mumbai Police regarding the phone threatening to MP Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.