एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी

By रेश्मा शिवडेकर | Published: June 26, 2024 09:55 PM2024-06-26T21:55:11+5:302024-06-26T21:55:27+5:30

मुंबई- एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका (आन्सर की) २७ ते ३० जून दरम्यान विद्यार्थी-पालकांना पाहण्याकरिता पुन्हा एकदा उपलब्ध करून दिल्या ...

A chance to revisit MHT-CET question papers and answer sheets | एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी

एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी

मुंबई- एमएचटी-सीईटीच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका (आन्सर की) २७ ते ३० जून दरम्यान विद्यार्थी-पालकांना पाहण्याकरिता पुन्हा एकदा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही परीक्षा विविध सत्रात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये तीन दिवसांकरिता उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर ती काढून टाकण्यात आली. निकाल १६ जूनला जाहीर केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी उत्तरतालिका पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्याची मागणी सीईटी-सेलकडे केली होती. त्यानुसार पीसीए गटासाठी २७ आणि २८ जून आणि पीसीबी गटासाठी २९ आणि ३० जूनला उत्तरतालिका व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Web Title: A chance to revisit MHT-CET question papers and answer sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा