गोरेगाव इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांचा तपास करण्यासाठी समिती स्थापन

By जयंत होवाळ | Published: October 8, 2023 04:50 PM2023-10-08T16:50:52+5:302023-10-08T16:51:13+5:30

Mumbai News: गोरेगाव येथील एसआरए इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या  अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली आहे.

A committee has been formed to investigate the causes of the Goregaon building fire | गोरेगाव इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांचा तपास करण्यासाठी समिती स्थापन

गोरेगाव इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांचा तपास करण्यासाठी समिती स्थापन

googlenewsNext

- जयंत होवाळ
मुंबई - गोरेगाव येथील एसआरए इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या  अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली आहे.समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
आग नेमकी कशामुळे लागली,आग लागण्यास जबाबदार कोण , इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा होती का,असल्यास ती सक्षम होती का याचा तपास समिती करेल.त्याशिवाय भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाय सुचवण्याची शिफारसही समितीला करण्यात आली आहे.

Web Title: A committee has been formed to investigate the causes of the Goregaon building fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.