गिरणी कामगार घरांसाठी आमदारांची समिती नेमणार; सरकार कालबद्ध कार्यक्रम राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 08:02 AM2023-03-26T08:02:10+5:302023-03-26T08:02:17+5:30

या घरांबाबत एक  कालबद्ध कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल.

A committee of MLAs will be appointed for mill worker housing | गिरणी कामगार घरांसाठी आमदारांची समिती नेमणार; सरकार कालबद्ध कार्यक्रम राबविणार

गिरणी कामगार घरांसाठी आमदारांची समिती नेमणार; सरकार कालबद्ध कार्यक्रम राबविणार

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहाच्या आणि दोन्ही बाजूंच्या सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत केली. 

या घरांबाबत एक  कालबद्ध कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. पात्र उमेदवारांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येणार असून, यासाठी छाननी समितीमार्फत छाननी प्रक्रिया पूर्ण करून लवकरच नवी यादी जाहीर करण्यात करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. संबधित निर्णय आता बदलून काही फरक पडणार नाही. गिरणी कामगारांसाठी काहीच उरले नाही. त्यामुळे लवकरच गिरणी कामगारांसाठी कालबद्ध कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.

सुनील राणे यांनी गिरणी कामगरांच्या घराच्या प्रश्नासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर फडणवीस यांनी सांगितले, की  गिरणी कामगारांनी काही जागा निश्चित केल्या असून, त्या जागांवर काही आरक्षण किंवा गायरान जमीन आहे का, हे तपासून पाहिले जाऊन लवकरच या जागाही निश्चित केल्या जातील.  यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, कालिदास कोंळबकर, सदा सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केले.

Web Title: A committee of MLAs will be appointed for mill worker housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.