शिफ्ट बदली न करुन दिल्यामुळे डी-मार्ट कर्मचाऱ्याने लावली सामनाला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 05:27 AM2023-07-16T05:27:30+5:302023-07-16T05:27:56+5:30
भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल (२३) ही मे २०२२ पासून डी मार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेच्या डी मार्टमधील एका महिला कर्मचाऱ्याने सुट्टी मिळाली नाही, तसेच शिफ्ट बदली करून दिली नाही, याचा राग येऊन डीमार्टमधील सामानाला आग लावून नुकसान केले. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल (२३) ही मे २०२२ पासून डी मार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे. १३ जुलैला दुसऱ्या मजल्यावरील ब्लँकेट व उशी कव्हरच्या बॉक्सला आग लागली म्हणून ती विझवण्यात आली. सीसीटीव्हीत मेहेक त्यावेळी दिसून आल्याने तिच्याकडे डी मार्टच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता सुट्टी मिळाली नाही. तसेच शिफ्ट बदली करून न दिल्याने राग येऊन आग लावल्याचे तिने सांगितले. सहायक व्यवस्थापक विनोद लाड यांच्या फिर्यादीवरून मेहेकवर भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.