नाेट दहाची की शंभरची? स्पर्शाने कळणार किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 08:06 AM2022-07-26T08:06:01+5:302022-07-26T08:06:10+5:30

आरबीआयची उच्च न्यायालयाला माहिती

A date of ten or a hundred? The price will be known by touch | नाेट दहाची की शंभरची? स्पर्शाने कळणार किंमत

नाेट दहाची की शंभरची? स्पर्शाने कळणार किंमत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दृष्टिहीन व्यक्तींसाठी चलनी नोटांमध्ये स्पर्शिक वैशिष्ट्यांचा समावेश केला असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. नवीन चलनी नोटा व नाणी दृष्टिहीन व्यक्तींना ओळखताना कठीण जात असल्यासंदर्भातील तक्रार नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडने (एनएबी) जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.

याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले की, यापूर्वीच्या चलनी नोटा व नाणी वेगवेगळया आकारात होती. त्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना त्या सहजपणे ओळखता येत होत्या. ‘ही याचिका दाखल केल्यानंतर आरबीआयने एक ॲप विकसित केले, ते ॲप दृष्टिहीन व्यक्ती वापरू शकतात,’ असे वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले. ॲप विकसित करण्याशिवाय आरबीआयने दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांशी सल्लामसलतही केली आहे. त्यानंतर आरबीआयने दृष्टिहीनांसाठी चलनी नोटांमध्ये अनेक स्पर्शिक वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. 

दृष्टिहीनांसाठी नाेटांची रचना अशी
१०० च्या नोटेवर त्रिकोण आहे आणि चार रेषा आहेत, तर ५०० च्या नोटेवर वर्तुळ आहे आणि पाच रेषा आहेत, तर २००० च्या नोटेवर आयत आणि सात रेषा आहेत, अशी माहिती आरबीआयच्यावतीने ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला दिली. 

याचिकेद्वारे गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी आणखी काही सूचना करायच्या असल्यास अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे न्यायालयाने म्हटले.

 

Web Title: A date of ten or a hundred? The price will be known by touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.