'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:59 PM2023-11-07T18:59:28+5:302023-11-07T19:00:02+5:30

ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.

A delegation of OBC community today met Deputy CM Devendra Fadnavis in Mumbai. | 'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

मुंबई: एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे. 

आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. 

छगन भुजबळांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर तुमची भूमिका काय आहे?, असे शिष्टमंडळाने विचारले. यावर आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षाणाला धक्का लागून देणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळाला दिलं. सदर भेटीबाबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

दरम्यान, ओबीसी समाजाला धक्का न लावता किंवा अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल. अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी किंवा अन्य समाजामध्ये कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजावर अन्याय न करता, धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

Web Title: A delegation of OBC community today met Deputy CM Devendra Fadnavis in Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.