Join us

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसताना शहरात बोगस फिजीओथेरपीस्टचा धुमाकूळ

By स्नेहा मोरे | Published: September 10, 2022 6:34 PM

कोणत्याही प्रकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसताना शहरात बोगस फिजीओथेरपीस्टने धुमाकूळ घातला आहे.

मुंबई -  कोणत्याही प्रकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसताना शहरात बोगस फिजीओथेरपीस्टने धुमाकूळ घातला आहे. ही मंडळी रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे विदारक चित्र शहरातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये सर्रास दिसून येत आहे. बनावट फिजीओथेरपीस्टवर नियंत्रण मिळविण्याबाबत सरकारी पातळीवरही अनास्था आहे.कोणत्याही फिजीओथेरपीस्टला प्रॅक्टिस करण्यासाठी मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये शिक्षण घेणे बंधनकारक असते. फिजीओथेरपीस्टसाठी बॅचलर ही पदवी साडेचार वर्षांची असून, मास्टर ही पदवी तीन वर्षांची आहे. नाशिक शहरात नाशिक जिल्हा फिजीओथेरपीस्टकडे नोंद असलेले केवळ ९५ फिजीओथेरपीस्ट आहेत. 

केवळ अनुभवाच्या आधारे ही मंडळी प्रॅक्टिस करीत आहेत. फिजीओथेरपीस्टने काम सुरू करताना राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील फिजीओथेरपीस्ट संस्थांकडे नोंदणी करणे अनिवार्य असताना अनेकांनी केलेली नाही. ज्यांच्याकडे शिक्षण आहे अशाच व्यक्तींना नोंद करता येत असल्याने याकडे कुणी वळत नाही.सरकारी अनास्थापैसे वाचवण्याच्या दृष्टीने अनेक मान्यताप्राप्त रुग्णालयांनी  मान्यताप्राप्त विद्यापीठातून  पदवी घेतलेले फिजीओथेरपीस्ट नोकरीला ठेवलेले नाहीत. बोगस फिजीओथेरपीस्टवर नियंत्रणाबाबत सरकारतर्फे कुठलीही यंत्रणा नाही.दुखणे वाढलेफिजीओथेरपीस्टकडून इलेक्ट्रोथेरपी, एक्जरसाईज थेरपी, मॅन्युपलेशन थेरपी केली जाते. बोगस उमेदवारांकडून उपचार केल्यानंतर रुग्णांची दुखणी जास्त झाल्याची उदाहरणे घडत आहेत.त्या व्यक्तीलाच कायदेशीर परवानगीडॉ. आनंद मिश्रा, फिजिओथेरपिस्ट असोसिएशन राज्यभरात बोगस फिजीओथेरपीस्टची संख्या जास्त आहे, यात शंका नाही. आमच्या संघटनेकडून माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. बोगस फिजीओथेरपीस्टची यादी सरकारकडे देणार आहोत.महाराष्ट्र कायदा २००४ (२) नुसार, नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट खेरीत कोणतीही व्यक्ती फिजिओथेअरपीचा व्यवसाय करु शकत नाही. परिषदेकडे नोंदणी असललेल्या व्यक्तीलाच कायदेशीर आणि नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट म्हणून ग्राह्य धरले जाते. चुकीच्या अभ्यासक्रमामुळे फसवणूकमोठमोठ्या रुग्णालयातही फिजिओथेरपिस्टची मागणी वाढल्याने यासंदर्भातील अभ्यासक्रम शिकविणाऱ्या विविध संस्थांचे पेव फुटले आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सअंतर्गत विविध अभ्यासक्रम घेतले जातात. मात्र, ते मान्यता प्राप्त आहे अथवा नाही याची शहानिशा करूनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे गरजेचे आहे. काही संस्थांमध्ये नर्सही रुग्णांना सेवा देतात. रुग्णांनी हक्काबाबत जागरूक राहून प्रमाणित फिजिओथेरतपस्टकडूनच योग्य उपचार घेणे गरजेचे ठरते..... व्यवसाय करण्याची परवानगी नाहीमहाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळाच्यावतीने दिला जाणारा डिप्लोमा इन फिजिओथेरपिस्ट आणि अंध फिजिओथेअरपी डिप्लोमाचे विद्यार्थी स्वतंत्रपणे फिजिओथेअरपीचा व्यवसाय करु शकत नाही.नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट यांच्या देखरेखीखाली संबंधित पदविका धारक विद्यार्थी केवळ तांत्रिक साहाय्यक म्हणून काम करु शकतात.फिजिओथेअरपी उपचाराचे नियोजन व प्रत्यक्षात रुग्णसेवा देण्याचे काम नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट काम आहे. व्यवसाय मंडळाचे पदविका धारक या कामासाठी प्रशिक्षित नाहीत. ते कायद्याने पात्र नाहीत.