देशभरातील कर्करुग्णांसाठी हक्काचे आश्रयस्थान

By संतोष आंधळे | Published: February 27, 2023 11:33 AM2023-02-27T11:33:59+5:302023-02-27T11:34:10+5:30

१९६८ साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत सीतासदन येथील खोलीत ४ कर्करोग रुग्णांच्या निवासाची व्यवस्था केली जायची.

A haven of rights for cancer patients across the country | देशभरातील कर्करुग्णांसाठी हक्काचे आश्रयस्थान

देशभरातील कर्करुग्णांसाठी हक्काचे आश्रयस्थान

googlenewsNext

- संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
परळ येथील टाटा कर्कराेग रुग्णालयापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नाना पालकर स्मृती समिती या संस्थेच्या रुग्ण सदनिका रुग्ण आणि नातेवाइकांसाठी आश्रयस्थान ठरल्या आहेत . गेली ५४ वर्षे या संस्थेमार्फत गरजू रुग्णांची येथे राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात येते.

१९६८ साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत  सीतासदन येथील खोलीत ४ कर्करोग रुग्णांच्या निवासाची व्यवस्था केली जायची. रुग्णसंख्या वाढत गेली तशी २६ वर्षांपूर्वी इमारतीशेजारी महानगरपालिकेकडून ९९ वर्षांच्या करारावर जागा घेऊन १० मजल्यांची इमारत उभी राहिली. तेथे ३४ खोल्या काढण्यात आल्या आहेत.

तीन ठिकाणी डायलिसिस सेंटर
संस्थेतर्फे तीन डायलिसिस सेंटर चालविण्यात येतात. 

ठाण्यात रुग्णउपयोगी वस्तू भाडेतत्त्वावर
संस्थेचे ठाणे येथे काम चालते. तेथे रुग्णांना वॉकर, रुग्णालयातील बेड्स आदी वस्तू स्वस्त दर आकारून भाड्याने देतात.

टीबी रुग्णांना 
मोफत औषधोपचार

परळ येथील संस्थेत टीबीच्या रुग्णांची तपासणी करून त्यांना महागडी औषधे मोफत दिली जातात. दर शुक्रवारी डॉ. कमलाकर कुलकर्णी येथे येत असतात.

संस्थेची कार्यकारिणी
अध्यक्ष - डॉ. श्रीकांत बडवे
कार्याध्यक्ष - डॉ. परेश नवलकर
उपाध्यक्ष - डॉ. जयंत पटवर्धन
सचिव - सुमेधा जोशी
खजिनदार - विवेक छत्रे
प्रशासकीय अधिकारी - सुदेश राजेशिर्के

    संस्थेत एकवेळच्या जेवणाचे दहा रुपये आणि नाश्ता पाच रुपयांत मिळतो. एका रुग्णासोबत जास्तीत जास्त दोन नातेवाइकांना राहण्याची परवानगी दिली जाते. 
    बोरिवली येथील संस्थेत टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने केमोथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी १६ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

गेली २६ वर्षे मी संस्थेत कार्यरत आहे. वर्षातून तीन वेळा रक्तदान शिबिर घेतले जाते आणि उपलब्ध होणारे रक्त सर्व सरकारी रुग्णालयांत दिले जाते. देणगीतून मिळणाऱ्या रकमेतून अनेक गोष्टी मोफत दिल्या जातात. अल्प दरात मुंबईतील जवळच्या रुग्णालयांत जाण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
- कृष्णा महाडिक, व्यवस्थापक

Web Title: A haven of rights for cancer patients across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा