दिल धक-धक करायला लावणारी मोटारसायकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:56 IST2023-09-11T14:55:49+5:302023-09-11T14:56:13+5:30
Motorcycle: नव्या पिढीतील जे मालिकेतील ही बुलेट ३५० असून, हिची तीन मॉडेल्स आहेत. पूर्वीपेक्षा काही मोठे बदलही यात केले गेले आहेत. पायाभूत म्हणजे बेस मॉडेल १.७४ लाख रुपये इतक्या एक्स शोरूम किमतीचे आहे.

दिल धक-धक करायला लावणारी मोटारसायकल
नव्या पिढीतील जे मालिकेतील ही बुलेट ३५० असून, हिची तीन मॉडेल्स आहेत. पूर्वीपेक्षा काही मोठे बदलही यात केले गेले आहेत. पायाभूत म्हणजे बेस मॉडेल १.७४ लाख रुपये इतक्या एक्स शोरूम किमतीचे आहे. त्यात पुढील चाकाला एबीएस डिस्क ब्रेकसह असून, मागील चाकासाठी ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.
मिलिटरी ब्लॅक आणि मिलिटरी रेड या रंगसंगतीत ही बुलेट उपलब्ध आहे. तीन प्रकारच्या मॉडेल्समध्ये वेगवेगळी उपयुक्त सामग्री यात असून, मध्य स्तरावरील मॉडेलची किमत १.९७ लाख रुपये एक्स शोरूम असून, यात स्टँडर्स ब्लॅक व मरून अशा दोन रंगात ते उपलब्ध आहे. बॉडी कलर टँक क्रोम फिनिश्ड रेअर व्हू मिरर आणि सोनेरी रंगातील रॉयल एनफिल्ड असे लिहिलेले बॅचेस त्याला लावले गेले आहेत. याच लघुनामफलकावर मोटारसायकलप्रेमी भाळत असतात. याची सर्वोच्च मॉडेलची किंमत २.१६ लाख रुपये एक्स शोरूमची असून, ब्लॅक गोल्ड व स्टँडर्ड मरून या रंगसंगतीत ते उपलब्ध आहे.
बुलेटची वैशिष्ट्ये
बुलेट ३५ ते ३७.२ किलोमीटर प्रति लीटर इतके मायलेज देते.
ताकद - २०.४ पीएस टॉर्क २७ एनएम कर्ब वेट १९५ किलोब्रेक डबल डिस्क ब्रेक ट्यूब टायर इंजिन ३४९ सीसी
१३ लीटरची इंधन टाकी, आणि बरेच काही या भारदस्त बुलेटला मिळते.
किंबहुना ‘नाम काफी है’ अशीच बुलेट वा रॉयल एनफिल्ड या मोटारसायकलीची ख्याती आजही कायम आहे.
ती मोहिनी, ते आकर्षण कायम स्वीकारण्याची नव्या पिढीचीही मानसिकता आहे, हेच बुलेटचे
वैशिष्ट्य आहे.
दणकटपणा, स्थिर रायडिंग, रस्ता पकडून धावण्याची क्षमता आणि नव्या काळातील ब्रेक, एबीएस आदींचीही सुविधा देणारी ही बुलेट आता या नव्या रूपात पुन्हा
एकदा बाजारात उतरली आहे.