मुंबई: मुंबई लोकल ट्रेन आणि दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकलमधील स्टंटबाजी व सीटसाठी होणारी वादावादी व हाणामारी नेहमीची बाब झाली आहे. मुंबईतील लोकलला होणाऱ्या गर्दीमुळे धक्का लागल्यावरून प्रवाशांची भांडणे आणि हाणामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना लोकल ट्रेनच्या महिला डब्यात घडली आहे.
मुंबई लोकलमधील महिलांच्या डब्यात दोन महिलांमध्ये जोरदार वादावादी झाली. बहुधा हे भांडण जागेवरून झाली असल्याचा अंदाज आहे. व्हिडिओमध्ये ती महिला धमकावतानाही दिसत आहे. ट्रेनमधून काढून फेकून देईन, असं महिला म्हणताना दिसून येत आहे.
दरम्यान, महिलांच्या डब्ब्यात धक्का लागल्याने हाणामारीच्या घटना सामान्य आहेत. काही दिवसांपूर्वी देखील लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकल ट्रेनच्या महिला डब्यात जोरदार वादावादी झाल्यानंतर दोन्ही महिला हाणामारी करायला लागल्या. एक महिला दुसऱ्या महिलेला हाताने मारते. त्यानंतर दोन्ही महिला एकमेकींचेकेस ओढून हाणामारी करायला लागतात. आजुबाजूच्या महिला या दोघींचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.