‘एक आडवा न् तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं...’, मुंबई-गाेवा मार्गावरील खड्डे ‘ट्राेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:05 AM2023-08-07T06:05:53+5:302023-08-07T06:06:21+5:30

चाैपदरीकरणाचे काम रखडल्याने सोशल मीडियावर थट्टा

'A horizontal and vertical pit, Chandravani has fallen...' mumbai goa highway trolled | ‘एक आडवा न् तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं...’, मुंबई-गाेवा मार्गावरील खड्डे ‘ट्राेल’

‘एक आडवा न् तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं...’, मुंबई-गाेवा मार्गावरील खड्डे ‘ट्राेल’

googlenewsNext

- अरुण आडिवरेकर 
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेली बारा वर्षे रखडलेले मुंबई-गाेवा महामार्गावरील चाैपदरीकरणाचे काम आता थट्टेचा विषय बनला आहे. पावसामुळे महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवास जीवघेणा ठरत आहे. महामार्गावरील हे खड्डे आता साेशल मीडियावर जाेरदार ‘ट्राेल’ हाेत आहेत. ‘एक आडवा न् तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं’ असे म्हणत कामाची खिल्ली उडवली जात आहे.

गणपतीपूर्वी एक लेन 
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दाेन दिवसांपूर्वी  गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण हाेईल, असे सांगितले. तसेच, डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्ग पूर्ण हाेईल, असे आश्वासन दिले आहे. 

गडकरींची नाराजी
रखडलेल्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या अधिवेशनात नाराजी व्यक्त केली. त्यांनी महामार्गाच्या कामावर पुस्तकच छापता येईल, असे वक्तव्य करून दिलगिरीही व्यक्त केली.

एक आडवा न् तिडवा खड्डा.... चंद्रावानी पडलाय गं,
मेला कंत्राटदार हसताेय कसा 
की काेकणकर पडला गं,
या आकांताचा तुला इशारा कळला गं
खड्डा आडवा येताे मला
की पाय माझा माेडला गं,
नकाे राणी नकाे रडू
खड्ड्यामध्ये नकाे पडू
इथून नकाे, तिथून जाऊ
रस्ता गावताेय का पाहू....
(हे गाणे साेशल 
मीडियावर फिरत आहे.)

या महामार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे ‘एक आडवा न् तिडवा खड्डा’ म्हणत साेशल मीडियावर ‘ट्राेल’ हाेऊ लागले आहेत. 

Web Title: 'A horizontal and vertical pit, Chandravani has fallen...' mumbai goa highway trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे