Join us

‘एक आडवा न् तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं...’, मुंबई-गाेवा मार्गावरील खड्डे ‘ट्राेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 6:05 AM

चाैपदरीकरणाचे काम रखडल्याने सोशल मीडियावर थट्टा

- अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : गेली बारा वर्षे रखडलेले मुंबई-गाेवा महामार्गावरील चाैपदरीकरणाचे काम आता थट्टेचा विषय बनला आहे. पावसामुळे महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवास जीवघेणा ठरत आहे. महामार्गावरील हे खड्डे आता साेशल मीडियावर जाेरदार ‘ट्राेल’ हाेत आहेत. ‘एक आडवा न् तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय गं’ असे म्हणत कामाची खिल्ली उडवली जात आहे.

गणपतीपूर्वी एक लेन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दाेन दिवसांपूर्वी  गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण हाेईल, असे सांगितले. तसेच, डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्ग पूर्ण हाेईल, असे आश्वासन दिले आहे. 

गडकरींची नाराजीरखडलेल्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या अधिवेशनात नाराजी व्यक्त केली. त्यांनी महामार्गाच्या कामावर पुस्तकच छापता येईल, असे वक्तव्य करून दिलगिरीही व्यक्त केली.

एक आडवा न् तिडवा खड्डा.... चंद्रावानी पडलाय गं,मेला कंत्राटदार हसताेय कसा की काेकणकर पडला गं,या आकांताचा तुला इशारा कळला गंखड्डा आडवा येताे मलाकी पाय माझा माेडला गं,नकाे राणी नकाे रडूखड्ड्यामध्ये नकाे पडूइथून नकाे, तिथून जाऊरस्ता गावताेय का पाहू....(हे गाणे साेशल मीडियावर फिरत आहे.)

या महामार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे ‘एक आडवा न् तिडवा खड्डा’ म्हणत साेशल मीडियावर ‘ट्राेल’ हाेऊ लागले आहेत. 

टॅग्स :खड्डे