लेप्टो आणि डेंग्यू आपले रंग दाखवू लागलेत; गेल्या महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 01:18 PM2023-08-02T13:18:38+5:302023-08-02T13:19:39+5:30

जरी काही प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी या रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. यापूर्वीच महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

A huge increase in the number of patients of Lepto and dengue compared to last month | लेप्टो आणि डेंग्यू आपले रंग दाखवू लागलेत; गेल्या महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ

लेप्टो आणि डेंग्यू आपले रंग दाखवू लागलेत; गेल्या महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ

googlenewsNext

मुंबई  : पावसाळी आजारांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ हाेत आहे. यामध्ये मुंबई शहरात जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात लेप्टो आणि डेंग्यूच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.  त्यामुळे नागरिकांनी आता या आजारापासून विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या आजारांमधील गुंतागुंत टाळायची असेल तर रुग्णाला लक्षणे दिसत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
   
जरी काही प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी या रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. यापूर्वीच महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागांचे दिलेल्या माहितीत असे सांगितले आहे की,  जरी काही प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी या आजारांमधील रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. मात्र नागरिकांनी सर्वतोपरी दक्षता घ्यावी. लक्षणे दिसताच त्याबाबत निदान आणि उपचार करून घ्यावेत. 

Web Title: A huge increase in the number of patients of Lepto and dengue compared to last month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.