शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 09:36 AM2023-11-10T09:36:37+5:302023-11-10T09:39:31+5:30

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.

A letter from Sharad Pawar, and 52 caste obits; Bachu Kadu told directly | शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे, यावरुन आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ' खासदार शरद पवार यांनी एका पत्रात ५२ जातींना ओबीसीमध्ये आणले असं म्हटले आहे. 

वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, ९ जखमी; भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न?

आमदार बच्चू कडू म्हणाले, ओबीसींचे खरे नेते आहेत. शरद पवार यांनी ५२ जाती एका पत्रामुळे ओबीसीमध्ये आल्या, त्यावेळी मराठा समाजाही त्या पत्रात समावेश केला असत तर काम जमलं असतं. ५२ जाती एका पत्रामुळे ओबीसीमध्ये येत असतील तर मराठा समाजाचं सर्व वस्तुस्थितीला धरुन असुनही का होत नाही, हा मुळात प्रश्न आहे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.  

मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथेली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आज या दौऱ्याची पाटील यांनी घोषणा केली आहे. पाटील यांचा दौरा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांनी माहिती दिली. 

थेट ISIS शी संबंधित पीएचडी विद्यार्थ्याला अटक, ATS पथकाची कारवाई

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले,  आम्ही राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. १५ नोव्हेंबर २०२३ पासून ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू करत आहे. तिसऱ्या टप्प्यातील १५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा. १६  रोजी दौड, मायणी. १७ रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड. १८ रोजी सातारा, मेंढा, वाईस रायगड. १९ रोजी रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी. २० रोजी आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, २१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर. २२ रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर. २३ रोजी नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव. हा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे. 

Web Title: A letter from Sharad Pawar, and 52 caste obits; Bachu Kadu told directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.