समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 04:04 PM2023-11-22T16:04:09+5:302023-11-22T16:08:07+5:30

बेजबाबदार नागरिक गल्ली - बोळात बिनदिक्कतपणे कचरा टाकताना दिसतात.

A lot of garbage was thrown into the sea and the video went viral The municipality imposed a fine of 10 thousand | समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड!

समुद्रात टाकला भरभरून कचरा अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड!

मुंबई :

बेजबाबदार नागरिक गल्ली - बोळात बिनदिक्कतपणे कचरा टाकताना दिसतात. पण, थेट ताज महल हॉटेलच्या समोर गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात भरभरून कचरा  टाकतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

कचरा टाकतानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालिकेने संबंधितांचा शोध घेतला आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.  तसेच टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गेट वे ऑफ इंडिया हे देशी - विदेशी पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक येतात. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

 पर्यटनस्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकत असलेले छायाचित्र हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओची दखल घेत महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी कचरा टाकणाऱ्याचा शोध सुरू केला. 
 कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबरच्या आधारे त्या व्यक्तिला शोधण्यात आले. त्यानंतर ‘ए’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी त्याला १० हजारांचा दंड ठोठावला. कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव हाजी अब्दुल रेहमान शाह काद्री असून, तो जे. जे. रुग्णालय परिसरात राहणारा आहे.

Web Title: A lot of garbage was thrown into the sea and the video went viral The municipality imposed a fine of 10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई