Join us

एक मर्द मराठा सत्तेला लाथ मारुन आला, एकनाथ शिंदेंचा मला अभिमान; चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 5:43 PM

आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

मुंबई- आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. ' एक मर्द मराठा सत्तेला लाथ मारून आला, एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे, असंही  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

"एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं", शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुमच्या सारखे कार्यकर्ते आहेत म्हणून पक्ष आहे. मी पनवेल येथील केळी विक्रेत्यांसारखे अनेकांना भेटलो. सर्वांनी मोदींचे नाव घेतले. पनवेल मधील १०० टक्के लोक भाजपला मतदान करणार हे नक्की आहे. मी आज लोकांना विचारलं पंतप्रधान कोण पाहिजे? त्यांनी मोदी पाहिजे, असं सांगितलं.

"काँग्रेस ने केलेलं पाप मोदींनी धुवून काढल. ९० टक्के मुस्लिमांनी कमळाला मतदान केलं आहे आणि आताही करणार आहे. आता लोकसभेत १९१ महिला खासदार होणार आहेत. आदिवासी महिलेला राष्ट्रपती करण्याचं काम मोदींनी केलं आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पनवेलमधील नागरिक मतदान मोदींना करणार आहेत, ४४० चा करंट पनवेल ची जनता देणार आहे. आम्हाला पनवेलमध्ये ६० हजार व्यक्तींच्या घरी जायच आहे. तसेच यावेळी  बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं. बावनकुळे म्हणाले, एक मर्द मराठा सत्तेला लाथ मारून आलेत, एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे. 

टॅग्स :चंद्रशेखर बावनकुळेएकनाथ शिंदे