मुंबई : बेरोजगारीमुळे निराशेच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या मॉडेलने अखेरीस मृत्यूला कवटाळल्याची घटना शुक्रवारी वर्सोवा येथे उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या मॉडेलचे नाव आकांक्षा मोहन (वय ३०) असे आहे. तिच्या मृतदेहानजीक पोलिसांना चिठ्ठी आढळून आली असून, त्यात तिने आपण खूश नसून शांतता हवी आहे, असे नमूद केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वर्सोवा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितनुसार, मोहन ही लोखंडवाला येथील यमुना नगर सोसायटीची रहिवासी होती. बुधवारी तिथे हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास जेवणाची ऑर्डरही दिली होती. मात्र, सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी बेल वाजविली असता तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मास्टर कीचा वापर करून खोलीचा दरवाजा उघडला.
आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून १४ वर्षाच्या मुलाची आत्महत्या
तेव्हा आकांक्षाने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी आकांक्षाला तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी आढळली असून, त्यात आत्महत्येसाठी कोणीही जबाबदारी नाही. मी खूश नाही, मला शांतता हवी होती, असा उल्लेख आहे. गेल्या काही महिन्यांपासून काम मिळत नव्हते. त्यामुळे आकांक्षा निराश होती असे निकटवर्तीयांनी पोलिसांना सांगितले.