मुंबई : सुमारे २० वर्षांपूर्वी परदेशात कामासाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेली मुंबईतील महिला सोशल मीडियाच्या मदतीने पाकिस्तानात सापडली आहे. पाकिस्तानातील हैदराबाद शहरात राहणाऱ्या हमीदा बानो (वय ७०) या २००२ मध्ये मुंबईहून दुबईत घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या. अलीकडेच हमीदा बानोने सोशल मीडियाद्वारे मुंबईतील कुर्ला येथील तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. यामुळे त्यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मुंबईतील यास्मिन शेख या महिलेला अखेर २० वर्षांनी सोशल मीडियाचा वापर करून हरवलेली आई सापडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिने तिची आई पाकिस्तानमधील एका व्हिडिओमध्ये पाहिली, जो व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केला गेला. यास्मिन शेख पुढे म्हणाले की, तिची आई, हमीदा बानू कतार येथे स्वयंपाकी म्हणून काम करण्यासाठी गेली होती आणि त्यानंतर पुन्हा तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला नाही. तिला पाकिस्तानातून परत आणण्याची विनंती तिने भारत सरकारकडे केली.यास्मिन शेख यांनी सांगितले की, “पाकिस्तानस्थित एका सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मला माझ्या आईबद्दल २० वर्षांनंतर कळले, त्या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला होता. "ती अनेकदा कतारला 2-4 वर्षांपासून जायची, पण यावेळी ती एका एजंटच्या मदतीने गेली होती आणि परत आलीच नाही. आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले कारण आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्यामुळे आम्हाला तक्रारही करता आली नाही.," ती पुढे म्हणाली. यास्मिन पुढे म्हणाली की, तिची आई हमीदा बानू दुबईला स्वयंपाकी म्हणून काम करण्यासाठी गेल्यानंतर तिच्या कुटुंबाशी कधीही संपर्क साधला नाही. "जेव्हा आम्ही माझ्या आईचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी एजंटला भेटायला जायचो, तेव्हा ती (एजंट) म्हणायची की, माझी आई आम्हाला भेटू इच्छित नाही किंवा बोलू इच्छित नाही आणि आम्हाला आश्वासन द्यायची की, ती ठीक आहे. व्हिडिओमध्ये ती स्पष्टपणे सांगितले की, एजंटने तिला सत्य कोणालाही सांगू नका असे सांगितले होते," असे यास्मिन पुढे म्हणाली.
अलीकडेच मारूफ यांनी तिची कहाणी दुबई हमीदाच्या मुंबईतील परिचितांपर्यंत पोहोचेल, या आशेने यू-ट्यूबवर पोस्ट केली. अखेर हा व्हिडिओ खफलान शेख नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला.त्याने तो त्याच्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठविला. त्यानंतर तो कुर्ला येथे राहणाऱ्या हमीदा बानोची मुलगी यास्मिन बशीर शेखपर्यंत पोहोचला. व्हिडिओ बघताच यास्मिनने आईला ओळखले.