शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 01:31 PM2023-03-30T13:31:12+5:302023-03-30T13:34:23+5:30

आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली.

A National Memorial of Shivaji Maharaj should be erected in Delhi mp Udayanraje Bhosale met Amit Shah | शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट

शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट

googlenewsNext

आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत राष्ट्रीय  स्मारक उभारावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री शहा यांच्याकडे केली. या भेटी संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावरुन माहिती दिली.  

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे. 'याचबरोबर राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे अशीही मागणी केली. या भेटीत अमित शाह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, अशी माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. 

'काहीजण चुकीचं विधानं करत आहेत, सर्वांनी शांतता पाळावी'; ठाकरे गटाच्या नेत्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

काय आहे फेसबुक पोस्ट

‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ 
(CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ NATIONAL MEMORIAL) हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल. तसेच महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण (National Archeological Survey Of India) आणि पुराभिलेखागार विभाग (Archive Department) यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक आहे. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे, असेही गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. यापार्श्वभुमीवर शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा अशीही मागणी केली. त्याबाबत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले.

Web Title: A National Memorial of Shivaji Maharaj should be erected in Delhi mp Udayanraje Bhosale met Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.