लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाब्यात राहणारे नौदल अधिकारी निशांत गुप्ता (३१) यांनी २०१६ मध्ये ओएलएक्सवरून एक सेकंड हँड दुचाकी सव्वालाख रुपये खरेदी करत स्वतःच्या नावावर केली. आता गाडीचे कागदपत्र ते बाइकच्या स्टोरीज बॉक्समध्ये ठेवायचे, बाइक बिल्डिंगच्या खाली पार्क केली जायची. गुप्तांच्या म्हणण्यानुसार, २८ ऑक्टोबर २०२२ ते २१ नोव्हेंबर २०२२ दरम्यान ते दिल्लीला गेले होते. मात्र, तिथून परतल्यानंतर ती त्यांना तिथे सापडली नाही. त्यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला. मात्र, ती मिळाली नाही, म्हणून तक्रार करण्यासाठी ते गाडीचे पेपर शोधत होते आणि पुन्हा त्यांना कामानिमित्त दिल्लीला जावे लागले. त्यानुसार, या प्रकरणी त्यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात धाव घेत, अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
या दरम्यान गाडीचे पेपर स्टोरेज बॉक्समध्ये ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि ९ मार्च २०२३ रोजी त्यांना ट्राफिक ॲप्लिकेशनवरून त्यांच्या गाडी क्रमांकात अनोळखी व्यक्तीचा नंबर समाविष्ट केल्याचा मेसेज आला व त्यांची गाडी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.