Join us  

एक महिन्याच्या नववधूने दिला नऊ महिन्यांच्या बाळाला यकृताचा अंश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 7:19 AM

नऊ महिन्यांचा वायू विसावदियाला जन्मत:च पित्तनलिका नसल्याचे निदान झाले. त्यावेळी सहा दिवसांच्या असलेल्या वायूवर आतडे यकृताला जोडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबई : तो नऊ महिन्यांचा. ती लग्न होऊन महिनाभरापूर्वी घरात आलेली. त्या दोघांचे नाते काकू-पुतण्याचे. परंतु या नात्याचा नवेपणा जाणवू न देता त्या नववधूने सहज आपल्या यकृताचा अंश तान्ह्या बाळाला दिला. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तान्ह्यासाठी काकू नवी जन्मदात्रीच ठरली.

नऊ महिन्यांचा वायू विसावदियाला जन्मत:च पित्तनलिका नसल्याचे निदान झाले. त्यावेळी सहा दिवसांच्या असलेल्या वायूवर आतडे यकृताला जोडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. त्यामुळे बाळाला यकृताचा गंभीर आजार झाला. नुकतीच वायूची यकृताच्या रोपणाची एबीओआय शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती.

यकृत दानास आई-वडील अयोग्ययकृत निकामी होण्याच्या स्थितीत असलेल्या वायूकडे यकृत रोपणाशिवाय अन्य पर्याय नव्हता. वायूचे आई-वडील यकृत दान करण्यास योग्य नसल्यामुळे त्याची काकू विधी विसावदिया, ज्यांचे अवघ्या महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते, यांनी स्वेच्छेने त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्याची तयारी दर्शवली. नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रियेत सहभागी असलेले पेडियाट्रिक हेपटोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले, ‘पश्चिम भारतात प्रथमच डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला. 

बाळाच्या स्वादुपिंडाच्या खाली असलेल्या प्लिहेच्या शीरेपर्यंत आणि सुपिरियर मेसेन्टेरिक व्हेनपर्यंत (एसएमव्ही) पोहोचलो. त्यानंतर सांध्यातून रोपण केलेल्या यकृताला प्रवाह उपलब्ध करून दिला. अशा प्रकारे ॲट्रेटिक पोर्टल व्हेनला बायपास केले. शस्त्रक्रियेच्या साडेसहा तासांच्या कालावधीत प्रत्येक स्थिती उत्तम प्रकारे हाताळण्यात आली. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा हाेत आहे. - डॉ. अनुराग श्रीमाल, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया तज्ज्ञ