मुंबईत गर्जना घुमणार; गुजरातहून सिंहांची जोडी 'नॅशनल पार्क'मध्ये येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 09:48 AM2022-11-10T09:48:52+5:302022-11-10T09:55:01+5:30

गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते.

A pair of lions from Gujarat will enter the Sanjay Gandhi National Park in Mumbai by the end of November. | मुंबईत गर्जना घुमणार; गुजरातहून सिंहांची जोडी 'नॅशनल पार्क'मध्ये येणार

मुंबईत गर्जना घुमणार; गुजरातहून सिंहांची जोडी 'नॅशनल पार्क'मध्ये येणार

googlenewsNext

मुंबई : गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबरअखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेंबरअखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.

२६ सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रात क्षेत्रात १९७५- १९७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती.

सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात वाढदेखील झाली होती; परंतु, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात १७ वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला.

Web Title: A pair of lions from Gujarat will enter the Sanjay Gandhi National Park in Mumbai by the end of November.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.