बेस्ट पकडण्याच्या नादात प्रवाशाने पाय गमावला, उपचाराच्या खर्चाचा भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 06:16 AM2022-10-23T06:16:13+5:302022-10-23T06:16:33+5:30
शिंदे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाच्या पायऱ्यांवर पोलादी शीटचा तुकडा पडल्यामुळे अपघात झाला.
मुंबई : बेस्टच्या बसने धडक दिल्याने गोरेगाव येथील सुरेंद्र शिंदे (५९) यांना त्यांचा डावा पाय गमवावा लागला. शिंदे शिवडी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. त्यानुसार याप्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिंदे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाच्या पायऱ्यांवर पोलादी शीटचा तुकडा पडल्यामुळे अपघात झाला. जखमी शिंदे हे बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. पण चालकाने गाडी थांबवली नाही. त्यांचा उजवा पाय पायऱ्यांवर होता. परंतु बसच्या धडकेमुळे, सैल पत्र्याने त्यांचा डावा पाय चिरडला.
बेस्ट प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंबाने नुकसानभरपाईचा दावा केला आहे. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांना त्यांचा गुडघ्याखालील पाय कापण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यातच त्यांची कोविड-१९ चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरएके मार्ग पोलिसांनी याप्रकरणी बेस्टच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.