प्लास्टीकची पिशवी दिसल्यास धरले जाईल बकोटे; पालिका पथकांचा राहणार वॉच 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:21 AM2023-08-10T10:21:00+5:302023-08-10T10:21:06+5:30

पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या प्लास्टीकवर बंदी आणूनही काही दुकानदार छुप्या पद्धतीने प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात.

A plastic bag will hold Bakote if seen; Municipal teams will keep watch | प्लास्टीकची पिशवी दिसल्यास धरले जाईल बकोटे; पालिका पथकांचा राहणार वॉच 

प्लास्टीकची पिशवी दिसल्यास धरले जाईल बकोटे; पालिका पथकांचा राहणार वॉच 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्लास्टीकवर बंदी असतानाही मुंबईत सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जात आहेत. मात्र, आता प्लास्टीक वापरणाऱ्यांची काही खैर नाही. पालिका प्लास्टीक विरोधातील मोहीम आणखी तीव्र करणार असून, प्रत्येक वॉर्डात पाचजणांचे पथक स्थापन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या प्लास्टीकवर बंदी आणूनही काही दुकानदार छुप्या पद्धतीने प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात. या विरोधात मोहीम आणखी तीव्र करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. वॉर्ड स्तरावरचा अधिकारी, एमपीसीबीचा अधिकारी, तसेच पोलिस अधिकारी अशा एकूण पाचजणांचे पथक प्लास्टीक बंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही याची शहानिशा करणार आहे. गेल्या वर्षभरात पालिकेने ७९ लाख रुपयांचा दंड वसूल केला असून, सगळ्यात जास्त प्लास्टिक पिशव्या रस्त्यावरील फेरीवाल्यांकडे आढळतात. त्यांच्यावर या पथकाचे विशेष लक्ष असेल.

पाच हजारांचा दंड आणि तीन महिन्यांचा कारावास
राज्य सरकारच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार पहिल्यांदा प्लास्टिक उत्पादन, विक्री, साठवणूक व वाहतूक करताना आढळून आल्यास पाच हजार रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा सापडल्यास १० हजार, तिसऱ्यांदा आढळून आल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अशी शिक्षेत तरतूद करण्यात आली आहे.

प्लास्टीक पाऊचेस, कंटेनर, बाऊल्स, २०० मि.ली. पेक्षा कमी बाटली, एकदा वापर करण्यात येणारे प्लास्टीकचे ग्लास, प्लेट तसेच ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या

Web Title: A plastic bag will hold Bakote if seen; Municipal teams will keep watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.