Join us  

रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी मोजावे लागले सव्वा लाख

By मनीषा म्हात्रे | Published: September 07, 2022 7:30 PM

३ सप्टेंबर रोजी त्यांना सुश्रुत हॉस्पिटलची अपॉइंटमेंट हवी असल्याने गुगलवरून सर्चिग सुरु केले.

 

मुंबई : गुगलवरील ठगांमुळे वडाळा येथील वकील महिलेला रुग्णालयाच्या अपॉईंटमेंटसाठी सव्वा लाख रुपये जमविण्याची वेळ ओढावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. वडाळा परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय वकील महिलेच्या तक्रारीनुसार,  ३ सप्टेंबर रोजी त्यांना सुश्रुत हॉस्पिटलची अपॉइंटमेंट हवी असल्याने गुगलवरून सर्चिग सुरु केले.

गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट घेतली. कॉल धारकाने अपॉइंटमेंट बुक केल्याचे सांगून ५ रुपयांचे क्षुल्क भरण्यास सांगितले. व्हॉट्सअँप क्रमांकावर टोकन क्रमांक ३ असा पाठवून विश्वास संपादन केला. त्यांनी ठगाने पाठविलेल्या लिंकनुसार व्यवहार केले. त्यानंतर, सायंकाळच्या सुमारास आलेल्या संदेशाने त्यांना धक्का बसला. त्यांच्या खात्यातून तब्बल सव्वा लाख रुपये काढण्यात आले होते. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :मुंबई