महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच 2023 मध्ये 3927 असे विक्रमी गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण

By सचिन लुंगसे | Published: January 11, 2024 02:07 PM2024-01-11T14:07:48+5:302024-01-11T14:08:14+5:30

कोरोनाच्या प्रभावामुळे 2022 मध्ये फक्त 1749 प्रकल्प होऊ शकले पूर्ण

A record number of 3927 housing projects completed in 2023 for the first time after the establishment of Maharera | महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच 2023 मध्ये 3927 असे विक्रमी गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण

महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच 2023 मध्ये 3927 असे विक्रमी गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण

मुंबई : महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात एका वर्षात 3927 गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 2019 ते 2021 या 3 वर्षांत दरवर्षी 2 हजारांच्या वर गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले होते . 2019 मध्ये 2232; 2020 मध्ये 2573 आणि 2021 मध्ये 2326 गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले होते. 2022 मध्ये मात्र स्थावर संपदा क्षेत्राला करोनाचा मोठा फटका बसल्याचे दिसते. ज्यामुळे 2022 मध्ये फक्त 1749 प्रकल्प पूर्ण होऊ शकले होते .

राज्यात सर्वात जास्त प्रकल्प पूर्ण होण्याचे प्रमाण मुंबई, मुंबई उपनगर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी भागांचा समावेश असलेल्या कोकण परिसरात आहे. या भागात 1552 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यानंतर पुणे क्षेत्रातही 1372 असे मोठ्या प्रमाणात प्रकल्प पूर्ण झालेले असून यात पुण्याशिवाय सातारा कोल्हापूर, सोलापूर ,सांगली या भागांचा समावेश आहे. 

यानंतर नाशिक , अहमदनगर , धुळे, जळगाव, नंदुरबारचा समावेश असलेल्या नाशिक क्षेत्रात 500 प्रकल्प पूर्ण झाले असून नागपूर , चंद्रपूर,भंडारा, गडचिरोली , गोंदिया, वर्धा यांचा समावेश असलेल्या नागपूर क्षेत्रात 318 ; संभाजीनगर , जालना, बीड ,नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी यांचा समावेश असलेल्या संभाजीनगर क्षेत्रात 123; अमरावती, अकोला , बुलडाणा, यवतमाळ, वाशिम यांचा समावेश असलेल्या अमरावती क्षेत्रात 56 प्रकल्प पूर्ण झाले तर दिव दमण मध्ये प्रकल्प पूर्ण झाल्याची संख्या 6 आहे.

2022 मध्ये राज्यात करोनामुळे फक्त 1749 प्रकल्प पूर्ण झाले होते. यात कोकण क्षेत्रात 780, पुणे क्षेत्रात 583, नाशिक क्षेत्रात 210 , नागपूर क्षेत्रात 74 , संभाजीनगर क्षेत्रात 73, अमरावती क्षेत्रात 26 आणि दादरा नगर हवेलीमध्ये 3 प्रकल्प पूर्ण झाले होते.

 महारेराच्या स्थापनेपासून पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा वर्षनिहाय तपशील.

2017 404

2018 1595

2019 2232

2020 2573

2021 2326

2022 1749

2023 3927

प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन घरखरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाचे सुक्ष्म संनियंत्रण करण्यासाठी महारेराने सुक्ष्म संनियंत्रण कक्ष सुरू केलेला आहे. यासाठीच त्रैमासिक विविध प्रकल्प प्रगती अहवालाबाबत (QPR) महारेरा आग्रही आहे. यामुळे प्रकल्पातील त्रुटी वेळीच शोधणे शक्य होत आहे. भविष्यात प्रकल्प पूर्णतेत अडचणी येऊ नयेत यासाठीच महारेराने नवीन नोंदणीक्रमांक देताना प्रस्तावाची कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक छाननी काटेकोर सुरू केलेली आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी महारेरा सातत्याने सुक्ष्म संनियंत्रण करीत आहे. करीत राहणार आहे.

- अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा

Web Title: A record number of 3927 housing projects completed in 2023 for the first time after the establishment of Maharera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.