चारकोपमध्ये साकारली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती
By मनोहर कुंभेजकर | Published: November 16, 2023 04:13 PM2023-11-16T16:13:25+5:302023-11-16T16:13:52+5:30
यंदाच्या वर्षी जुन्नर शहराजवळ असलेल्या किल्ले शिवनेरीची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.
मुंबई-कांदिवली पश्चिम चारकोप ओम साई दर्शन प्रतिष्ठान (भुखंड क्र ८२९)च्यावतीने अनेक समाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ल्याची प्रतिकृती बनवली जाते. यंदाच्या वर्षी जुन्नर शहराजवळ असलेल्या किल्ले शिवनेरीची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.
किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यापुर्वी दरवर्षी त्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील जाणकारांकडून किल्ल्याची अधिकाधिक माहिती घेऊन त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून त्या सर्वांचा अभ्यास करून मगच प्रतिकृती बनवली जाते. प्रतिकृती बनवण्यासाठी सर्व लहान-थोर मंडळी, महिलांचा मोठा सहभाग असतो. तसेच मुंबईमध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला जातो. प्रतिकृती बघायला अनेक मान्यवरांची उपस्थिती असते अशी माहिती
चारकोप ॐ साई दर्शन प्रतिष्ठानचे सचिव संदीप जोशी यांनी दिली.
प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या वर्षी मल्हारगड, दुसऱ्या वर्षी विजयदुर्ग, तिसऱ्या वर्षी जंजिरा,चौथ्या वर्षी मालवण येथील सिंधुदुर्ग, पाचव्या वर्षी मुंबई जवळ असलेल्या किल्ले वसई, सहाव्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि गेल्या वर्षी म्हणजेच सातव्या वर्षी तोरणा किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली.
यंदा येथे साकारलेली किल्ले शिवनेरीची प्रतिकृती
आपण आपल्या मित्र-मंडळी आणि कुटुंबासह आवर्जुन बघायला या, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.