लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या, धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले व्हिस्टाडोम डबे लोकप्रिय ठरत आहे. २०२३-२४ मध्ये या निसर्गरम्य प्रवासाचा १ लाख ७६ हजार ४०४ प्रवाशांनी लाभ घेतला. त्यामुळे मध्य रेल्वेला २६.५० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले.
२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे मुंबई - मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. डब्यांच्या लोकप्रियतेमुळे मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून हे डबे सुरू केले.
१५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावर आणखी दोन व्हिस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. २०२१ आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलैपासून तसेच पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये १० ऑगस्ट २०२२ पासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसादर मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
ही आहेत वैशिष्ट्ये व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छतासोबतच रुंद खिडक्या एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स, पुशबॅक खुर्च्या इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लायडिंग कंपार्टमेंट डोअर दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे सिरॅमिक टाइल्स फ्लोअरिंग असलेली टॉयलेट व्ह्यूइंग गॅलरी
पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस ४.९८मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन २.७२मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसचे उत्पन्न २.६०मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस २.३५
एक्स्प्रेसमधून मिळणारे उत्पन्न (काेटींमध्ये)मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस ७.६८छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव- ६.१६छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस