Join us

एकटी अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही; चित्रा वाघ यांचे रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 4:47 PM

गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे. यावरुन चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर आक्षेप घेतला होता, आता राष्ट्रवादीच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल पत्रकार परिषद घेऊन चाकरणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली आहे. आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला आहे.

 आमचा आक्षेप अंगप्रदर्शनावर आहे, या संदर्भात दोन तक्रारी आयोगाकडे आहेत. यात एका प्रकरणात वेगळा न्याय आणि दुसऱ्या प्रकरणात दुसरा न्याय. माझा आक्षेप संस्थेवर नाही. माझा आक्षेप हा संस्थेच्या अध्यक्षावर आहे. तिथे काय काम करतात याची माहिती मला आहे, आयोग म्हणजे तुम्ही एकट्या नाहीत. एका व्यक्तीला जाब विचारायचा आणि एका व्यक्तीला गोंजारायच, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केला. 

Maharashtra Politics: “गिरे तो भी टांग उपर! अजित पवारांचा अहंकार असा आहे की...”; भाजप नेत्याने सुनावले

'काल मला पाठवलेली नोटीस सर्वांच्या संमतीने पाठवली आहे. तुम्ही एकट्या म्हणजे आयोग नाही. सर्व सदस्यांची संमती घेऊन नोटीस पाठवायची असते. मुंबई पोलिसांनीही दखल घेतली नाही, असं तुम्ही म्हटला. हे तुम्ही कशाचा आधारावर सांगत आहात. तसा काही खुलासा असेलतर तुम्ही आम्हाला द्यावा. तुम्ही अशी विधाने करुन तुमच्या पक्षाचीही घालवत आहात, असा टोला चित्रा वाघ यांची चाकणकर यांनी लगावला. 

काल अध्यक्षांनी अनेक राजकीय नेत्यांवर आरोपांचा उल्लेख केला. मला बर वाटले तुम्ही या सर्व गोष्टींची नोंद ठेवली आहे. या सर्व प्रकरणात महिला आयोगाने काय केल ते अगोदर तुम्ही सांगायला हवे. तक्रारी आल्या तर त्यावर कारवाई करणे हे तुमचे काम आहे. त्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे, असंही वाघ म्हणाल्या. 

'काहीही झाले तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही. आमचा आक्षेप कपड्याच्या तुकड्यावर आहे. माझी लढाई सुरुच राहणार आहे. आमचा विरोध त्या महिलेला नाही, त्या महिलेचा सुरू असलेल्या नंगानाचला आहे. आम्ही आमची भूमिका मांडली होती, तुम्हाला यात कोणी आमंत्रण दिलेले नव्हते. तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. याअगोदर त्या पदावर अनेकजण बसले होते. यात त्यांनी चांगला ठसा उमटवला आहे, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.    

टॅग्स :चित्रा वाघरुपाली चाकणकरउर्फी जावेद