Join us

जयशंकर यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला; भर सभेत असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवला

By मुकेश चव्हाण | Published: October 28, 2022 3:03 PM

संयुक्त राष्ट्र सुरक्षा (UNSC) परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक मुंबईत घेण्यात आली.

मुंबई- संयुक्त राष्ट्र सुरक्षा (UNSC) परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक मुंबईत घेण्यात आली. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व पंधरा सदस्य देशांच्या राजदूतांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. 

१४ वर्षांपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. अतिरेकी शेजारच्या देशातून भारतात आले आणि त्यांनी मुंबईला चार दिवस ओलीस ठेवले. शेकडो लोक मरण पावले. शहीद झालेल्या वीरांना आम्ही सलाम करतो. २६/११ चा दहशतवादी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही, असं परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले.

काही प्रकरणांमध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा ही राजकीय कारणांमुळे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी असमर्थ ठरत आहे. यामुळे सामूहिक विश्वासार्हता आणि हितसंबंध कमी करते, असं सांगत जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला. तसेच राजकीय मतभेद विसरून दहशतवादाच्या लढाईत आपल्याला एकत्र यावे लागेल. दहशतवाद हे पूर्णपणे वाईट आहे, असं आवाहन देखील जयशंकर यांनी केलं.

दहशतवादाने जगाच्या अनेक भागांना ग्रासले आहे. आम्ही, भारतात, त्याची किंमत इतरांपेक्षा जास्त समजतो. पण त्या अनुभवानेच राष्ट्रीय संकल्पाची उभारणी होते. सीमेपलीकडील अनेक दशकांच्या दहशतवादाने लढा देण्याची आमची वचनबद्धता कमकुवत केली नाही आणि करणारही नाही, असं जयशंकर यांनी सांगितलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्लामुंबईपाकिस्तानदहशतवाद