Join us

खाऊगल्लीत चेंगराचेंगरी? मोठा रस्ता लोखंडी पत्र्यांमुळे निमुळता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 1:17 PM

गल्लीत गर्दी असल्याने येथे धक्काबुक्की हाेत असते तसेच चेंगराचेंगरीतून मार्ग काढून जीव धोक्यात घालावा लागत आहे.

मुंबई : भुयारी मेट्रोच्या कामाचा मोटा फटका मुंबई महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या खाऊ गल्लीला बसला आहे. येथून ये-जा करण्यासाठी रस्ता अरुंद झाल्याने या गल्लीत दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. अशात येथील प्रवाशांना पालिकेला मोठा वळसा घालून जावे लागते. गल्लीत गर्दी असल्याने येथे धक्काबुक्की हाेत असते तसेच चेंगराचेंगरीतून मार्ग काढून जीव धोक्यात घालावा लागत आहे.

मोठा रस्ता लोखंडी पत्र्यांमुळे निमुळता --  पालिका मुख्यालयाजवळ भुयारी मार्गाने आझाद मैदानाकडे जाताना वाटेत खाऊगल्ली लागते. सध्या येथे भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील मोठा रस्ता लोखंडी पत्रे लावून निमुळता केला गेला आहे. याच रस्त्यावरून दररोज हजारो लोक महापालिका, किल्ला कोर्ट, आझाद मैदानात येत असतात. मोर्चे, आंदोलक, पोलिस इतर नागरिकांसाठी खाऊगल्ली सोईची ठरते. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते.-  मात्र मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून येथील रहिवासी आणि प्रवाशांना रस्ताच उरला नाही.  २ ते ३ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी आता १५ मिनिटे लागत आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी येथे वाहन चालवणेसुद्धा कठीण होते. 

टॅग्स :वाहतूक कोंडीरस्ते सुरक्षा