लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी भरमसाठ शुल्क आकारण्यात येत असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून या ठिकाणी वाहनांचे पार्किंग शुल्क वसुलीसाठी आरती एंटरप्रायझेस या कंत्राटदारास कंत्राट दिले आहे.
पार्किंगसाठी ए, बी, सी या तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक श्रेणीनुसार पार्किंगचे दर आकारण्यात येतात. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील वाहन पार्किंगची जागा आच्छादित असल्याने ती ‘ए’ श्रेणीत मोडते. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगचे दर सर्वाधिक आहेत. हाच प्रकार मुंबईतील सर्वच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहात आहे. पार्किंग दरात सवलतीसाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांनी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये केली.
असे आहेत दर फोर व्हीलर
१ तास ७०/-रुपये ३ तास ८५/-रुपये ३ ते ६ तास १२०/रुपये टू व्हीलर१ तास २०/-रुपये३ तास ५०/-रुपये ३ ते ६ तास ७० /रुपये