एक लाख मुंबईकर कार्यकर्त्यांच्या घरी हिंदुत्ववाची गुढी : आ. ॲड. आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:48 PM2023-03-21T18:48:36+5:302023-03-21T18:49:28+5:30

गुढीपाडव्या निमित्त भाजपने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या संदर्भात आज आमदारआशिष शेलार यांनी माहिती दिली.

A treasure of Hindutva in the home of one lakh Mumbaikar activists: Aa. Adv. Ashish Shelar | एक लाख मुंबईकर कार्यकर्त्यांच्या घरी हिंदुत्ववाची गुढी : आ. ॲड. आशिष शेलार

एक लाख मुंबईकर कार्यकर्त्यांच्या घरी हिंदुत्ववाची गुढी : आ. ॲड. आशिष शेलार

googlenewsNext

मुंबई-गुढीपाडव्या निमित्त भाजपने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या संदर्भात आज आमदारआशिष शेलार यांनी माहिती दिली. हिंदूच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा भाजपा मुंबईच्या वतीने दणक्यात साजरा करण्यात येणार असून मुंबईत भाजपाचे कार्यकर्ते एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार आहेत, अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

'आता हिंदू सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरे केले जात आहेत. हिंदू सणांमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी, शिवजयंती आदी सण उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले. नुकतेच  ‘जाणता राजा’ महानाट्याच्या सादरीकरणालाही मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.  सुमारे १ लाख नाट्य रसिकांनी या महानाट्य पाहिले, असंही शेलार म्हणाले. 

त्यानंतर आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांत भाजपा नेते, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मिरवणुका देखील आयोजित करण्यात येणार आहेत.  लालबाग, परळ, वरळी विलेपार्ले, बोरिवली, दहिसर या भागात या शोभायात्रा काढण्यात येणार आहेत, असंही शेलार म्हणाले.

'भाजपाचे ९८०० बुथवर प्रत्येकी बुथवर ११ कार्यकर्ते आपल्या घरी गुढी उभारणार आहेत. अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर साकारण्यात येत असून तेही काम प्रगतीपथावर आहे. स्वप्नपूर्तीचा क्षण हा जवळ येत आहेच त्याचा ही आनंद या निमित्ताने साजरा केला जाणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

'भाजपा देशातील सर्वांत मोठा सेवाकार्य करणारा पक्ष आहे. हिंदू संस्कृतीचा समृध्द वारसा पुढे नेला जात आहे. गुढी म्हणजे विजय पताका असून प्रत्येक हिंदू बांधवांनी गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करत  खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची गुढी उभारावी असे आवाहन भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.

"तुम्ही JPCची मागणी सोडा, आम्ही राहुल गांधींच्या माफीची मागणी सोडू', काँग्रेसचा केंद्रावर आरोप

हे तर हिरव्या वादळाला उत्तर

गेल्या काही दिवसात उध्दव ठाकरे यांचा पक्ष आणि आघाडीतील पक्ष एका विशिष्ट समाजाचे मतांसाठी लांगुलचालन करीत मुंबईत हिरवे वादळ आणू पाहतेय त्याला उत्तर म्हणून ही हिंदूत्वाची गुढी भाजपा उभारत आहे, असा टोलाही आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

Web Title: A treasure of Hindutva in the home of one lakh Mumbaikar activists: Aa. Adv. Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.